बुधवार, २७ जुलै, २०११

शाक्य संघ

जयभीम मित्रहो,
शाक्य संघ काय आहे हे सांगण्याची गरज पडायला नको होती पण आज नाईलाजाने ते सांगवं लागताय ही वेळ येऊन ठेपली आहे. हे आपल्या शाक्य संघाचं दुर्दव आहे. शाक्य संघ ही जगातील बहुतेक पहिली व प्राचिन सामाजीक संघटना होय. भगवान बुद्धासारख्या महामनावाने ज्या संघाचं सास्यत्व स्विकारलं ते महान संघ म्हणजे शाक्य संघ. पुढे संघाच्या काही अटींची पुर्तता करण्यासाठी म्हणूनच त्यानी आपला देश सोडला. शाक्य आणी कोलियांच्या भांडणाचे रुपांतर युद्धात होऊ नये यासाठी भगवंतानी अनेक प्रयत्नही केले.
इ.स. पूर्व काळापासून लोकशाही मार्गाने एखादी संघटना चालविण्याचा मान शाक्य संघाचा आहे. आज आपण ज्या हजारो समाजसेवी संघटना बघतो त्यांचं मूळं हे शाक्य संघात आहे. शाक्य संघ जगातील सर्व लोकशाही संघटनाचं प्रेरणास्थान आहे. आज या संघटनेचा, बुद्धाचा व समतेचा विचार परत रुजविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून आपण परत एकदा शाक्य संघटना उभारु या. अन समतेची मुल्ये रुजवू या.
शाक्यं संघ कशासाठी?
शाक्य संघ ही संघटना सामाजीक व धार्मिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी उभी करण्यात आली आहे. बाबासाहेबानी १९५६ मध्ये बौद्धमय भारतचं स्वप्न पाहिल. हा देश बौद्ध लोकांचा होता त्याला हिंदू अन वेदिक लोकानी मोठ्या शिताफिनं अबौद्धमय करुन टाकलं. ज्या देशात समतेची मानवी मूल्य जोपासली जाऊ लागली होती तिथे जातियवादाने मुसंडी मारली. जिथे भगवान बुद्धाची पूजे होत असे तिथे शीव अन विष्णूचा अवतार उगवला. अशा प्रकारे बौद्ध धम्माची सर्व आघाड्यांवर तटबंदी करण्यात आली अन समतेचा, करुणेचा व मानवी मुल्याचा धर्म हद्दपार करण्यात आला.
तब्बल दोन हजार वर्षाचा काळ लोटून गेला तरी बौद्ध धम्माच्या मायभूमीत या धम्माची पुन:स्थापना करणारा मायेचा पूत जन्माला आला नव्हता. मधल्या काळात वेदीक धम्मानी ईतकी मोठी दिशाभूल करण्याची यंत्रणा राबविली की लोकं अक्षरशा खुद्द बुद्धांच्या लेण्यांमधे जाऊन पांडवानी कोरलेल्या लेण्य़ा आहेत असं म्हणू लागली. बौद्ध स्तूपांची नास धूस करण्यात आली. सर्वत्र लेण्यांवर अतिक्रमण करुन देवी देवतांच्या स्थापणा करण्यात आल्या. बौद्ध धम्माचं नामोनिशान राहणार नाही याची जबरदस्त तयारी केली गेली. त्यासाठी योजना आखण्याण्यात आल्या. स्वतंत्र यंत्रणा उभ्या करण्यात आल्या. धम्म उध्वस्त करण्याची मोहीम ईतक्या प्रभावीपणे राबविण्यात आली की पार बौद्ध धम्म नामशेष होऊन गेला.
बौद्ध धम्माचा हा तेजोभंग चालला तब्बल दोन हजार वर्ष. दोन हजार वर्षा पर्यंत बौद्ध धम्म एक धम्मवीराच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला होता. अन १४ एप्रिल १८९१ रोजी बौद्ध धम्माची पुन:स्थापना करणा-या धम्मवीराचा जन्म झाला. हा हा म्हणता हा धम्मवीर जगाच्या सर्वोत्तम विद्यापिठातून विद्याविभूषित होऊन विद्वेत्तेच्या लढयात उडी मारतो.  अनेक आघाड्या उद्वस्त करत आपली विद्वत्ता साबित करतो. त्या नंतर आपला मोर्चा वळवितो दास्यात खितपत पडलेल्या लोकांच्या मुक्तीकडे. मानसिक खच्चिकरण करुन दास्य लादलेल्या या अस्पृश्य वर्गाच्या मुक्तीचा लढा अत्यंत कुशलतापूर्वक लढवून अलौकीक अशी सामाजिक क्रांती घडवून आणतो अन अभूतपुर्व घटनांची मालीकाच उभी करतो. या सर्व लढायांत निर्विवाद विजय मिळविणारा हा महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
नुसतं विजय मिळवून प्रश्न सुटणार नाही हे जाणून असलेले बाबासाहेब या सर्व बांधवांसाठी एक भक्कम धार्मिक पाया उपब्ध करुन देण्याच्या विचारात होते. माणसाला धम्माची नितांत गरज आहे या मतावर बाबासाहेब ठाम होते. अन अत्यंत विद्वत्तापूर्वक अन सखोल अभ्यास करुन शेवटी अस्पृश्यवर्गासाठी बौद्ध धम्माची निवड करण्यात येते. अन तेंव्हा बाबासाहेब शपथ घेतात, गगनभेदी गर्जना करतात की, मी भारत बौद्धमय करेन. पण धर्मांतर नंतर अल्पावधित परिनिर्वाण झाल्यामूळे ते काम अधूर राहील. आता ही जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आहे. बाबासाहेबांचा पाईक म्हणून भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी आपल्या पैकी प्रत्येकाची आहे. या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी शाक्य संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. अन हे काम शाक्य संघ पूर्ण करुनच राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा