जयभीम मित्रहो,
शाक्य संघ काय आहे हे सांगण्याची गरज पडायला नको होती पण आज
नाईलाजाने ते सांगवं लागताय ही वेळ येऊन ठेपली आहे. हे आपल्या शाक्य संघाचं दुर्दव
आहे. शाक्य संघ ही जगातील बहुतेक
पहिली व प्राचिन सामाजीक संघटना होय. भगवान बुद्धासारख्या महामनावाने ज्या संघाचं
सादस्यत्व स्विकारलं ते महान संघ म्हणजे शाक्य संघ. बुद्धाच्या जन्माच्या कित्तेक
आधीपासून शाक्य समाजानी चालविलेली ही सामाजीक संघटना अत्यंत प्रबळ, समाजाभिमूख व
लोकशाहीच्या तत्वावर चालणारी संघटना होती. भगवान बुद्ध जेंव्हा सिद्धार्थ होते तेंव्हा या संघाच्या
एक निर्णयाच्या विरोधात त्यानी आवाज उठविला व संघानी त्याना बेदखल करीत देश
सोडण्याचे आदेश दिले. शाक्य आणी कोलियांच्या भांडणाचे रुपांतर युद्धात होऊ नये यासाठी
भगवंतानी अनेक प्रयत्नही केले, शेवट पर्यंत आपल्या शांततेच्या मार्गानी हा प्रश्न
निकाली काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला व शेवटी संघाच्या आदेशा प्रमाणे परिव्रजा
घेऊन देशत्याग केला. असा हा प्राचिन संघ म्हणजे शाक्य संघ होय. शेवटी शाक्य संघाला
आपली चुक लक्षात आली व त्यानी प्रतिनिधी नेमून सिद्धार्थाच्या मताप्रामाणेच प्रश्न
निकाली काढला.
इ.स. पूर्व काळापासून लोकशाही मार्गाने एखादी संघटना चालविण्याचा
मान शाक्य संघाचा आहे. आज आपण ज्या हजारो समाजसेवी संघटना बघतो त्यांचं मूळं हे शाक्य
संघात आहे. शाक्य संघ जगातील सर्व लोकशाही संघटनाचं प्रेरणास्थान आहे. आज या संघटनेचा, बुद्धाचा समतेचा विचार परत रुजविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
म्हणून आपण परत एकदा शाक्य संघटना उभारु या. अन समतेची मुल्ये रुजवू या.
शाक्यं संघ कशासाठी?
शाक्य संघ ही संघटना सामाजीक व धार्मिक परिवर्तन घडवून
आणण्यासाठी उभी करण्यात आली आहे. बाबासाहेबानी
१९५६ मध्ये बौद्धमय भारतचं स्वप्न पाहिले. हा देश बौद्ध लोकांचा होता त्याला हिंदू
अन वेदिक लोकानी मोठ्या शिताफिने अबौद्धमय करुन टाकले. सर्व बौद्ध मंदिराचे
वैष्णवीकरण करण्यात आले. ज्या देशात समतेची मानवी मूल्य जोपासली जाऊ लागली होती
तिथे जातियवादाने मुसंडी मारली. जिथे भगवान बुद्धाची पूजा होत असे तिथे शीव अन
विष्णूचा अवतार उगवला. अशा प्रकारे बौद्ध धम्माची सर्व आघाड्यांवर तटबंदी करण्यात
आली अन समतेचा, करुणेचा व मानवी मुल्याचा धर्म हद्दपार करण्यात आला.
तब्बल दोन हजार वर्षाचा काळ लोटून गेला तरी बौद्ध धम्माच्या
मायभूमीत या धम्माची पुन:स्थापना करणारा मायेचा पूत जन्माला आला नव्हता. मधल्या
काळात वेदीक धम्मानी ईतकी मोठी दिशाभूल करणारी यंत्रणा राबविली की लोकं अक्षरशा
खुद्द बुद्धांच्या लेण्यांमधे जाऊन पांडवानी कोरलेल्या लेण्य़ा आहेत असं म्हणू
लागली. बौद्ध स्तूपांची नास धूस करण्यात आली. सर्वत्र लेण्यांवर अतिक्रमण करुन
देवी देवतांच्या स्थापणा करण्यात आल्या. बौद्ध धम्माचं नामोनिशान राहणार नाही याची
जबरदस्त तयारी केली गेली. त्यासाठी योजना आखण्याण्यात आल्या. स्वतंत्र यंत्रणा
उभ्या करण्यात आल्या. धम्म उध्वस्त करण्याची मोहीम ईतक्या प्रभावीपणे राबविण्यात
आली की पार बौद्ध धम्म नामशेष होऊन गेला.
बौद्ध धम्माचा हा तेजोभंग चालला तब्बल दोन हजार वर्ष. दोन
हजार वर्षा पर्यंत बौद्ध धम्म एक धम्मवीराच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला होता.
अन १४ एप्रिल १८९१ रोजी बौद्ध धम्माची पुन:स्थापना करणा-या, धम्मानी हजारो वर्ष
ज्याची प्रतिक्षा केली तो धम्मवीर जन्मास आला. हा हा म्हणता हा धम्मवीर जगाच्या
सर्वोत्तम विद्यापिठातून विद्याविभूषित होऊन लढ्यास सिद्ध झाला. जातीयवाद्यांच्या अनेक आघाड्या उधस्त करत आपली
विद्वत्ता सिद्ध करताना बुद्धाच्या परागंदा झालेल्या धम्मास पुन:स्थापित
करण्याच्या दिशेनीही वाटचाल सुरु केली. जगातील सर्व विद्वानांकडुन आपल्या कुवतीवर,
विद्वत्तेवर नि ज्ञानसंपदेवर शिक्कामोर्तब करुन घेतला. जगातील तीन प्रसिद्ध
विद्यापिठातून उच्च शिक्षण संपादन केले. विद्येच्या व ज्ञानाच्या आयुधानी संपन्न
झाल्यावर लढ्याचे रणशिंग फुंकले. त्या नंतर आपला मोर्चा वळविला तो दास्यात खितपत
पडलेल्या लोकांच्या मुक्तीकडे. मानसिक खच्चिकरण करुन दास्य लादलेल्या या अस्पृश्य
वर्गाच्या मुक्तीचा लढा अत्यंत कुशलतापूर्वक लढवून अलौकीक अशी सामाजिक क्रांती
घडवून आणली अन अभूतपुर्व घटनांची मालीकाच उभी केली. या सर्व लढायांत निर्विवाद
विजय मिळविणारा हा महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
नुसतं विजय मिळवून प्रश्न सुटणार नाही हे जाणून असलेले
बाबासाहेब या सर्व बांधवांसाठी एक भक्कम धार्मिक पाया उपब्ध करुन देण्याच्या
विचारात होते. माणसाला धम्माची नितांत गरज आहे या मतावर बाबासाहेब ठाम होते. अन
अत्यंत विद्वत्तापूर्वक अन सखोल अभ्यास करुन शेवटी अस्पृश्यवर्गासाठी बौद्ध
धम्माची निवड करण्यात आली व सा-या जगाचे डोळे दिपून टाकणारा धर्मांतराच सोहळा
नागभूमीत पार पडला. तेंव्हा बाबासाहेब शपथ घेतात, गगनभेदी गर्जना करतात की, मी
भारत बौद्धमय करेन. पण धर्मांतर नंतर अल्पावधितच त्यांचे परिनिर्वाण झाल्यामूळे ते
काम अधूरे राहीले. आता ही जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आहे. बाबासाहेबांचा पाईक
म्हणून भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी आपल्या पैकी प्रत्येकाची आहे. या अपूर्ण
राहिलेल्या कामासाठी शाक्य संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. अन हे काम शाक्य संघ
पूर्ण करुनच राहील.
शाक्य संघ, पुणे.
मधुकर रामटेके
---------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकरण
१)
ब्राह्मण
द्वेष वर्ज्य.
२)
राजकीय सहभाग
नाही.
३)
बौद्धमय भारत
एक दिवा स्वप्न
४)
संघ
प्रवेशाच्या अटी.
(विपश्यनेची
अट अनिवार्य आहे, कमवता असावा, त्रिपिट,
बुद्ध व त्याचा धम्म आणि आंबेडकर चरित्र यावरील वर्ग/अभ्यासक्रम पुर्ण करणे
गरजेचं)
५)
कामाचे
स्वरुप: (धम्मदिक्षा, धम्म व्याख्यान, बाबासाहेबांवर व्याख्यान)
६)
शाळा,
महाविद्यालयांतून बाबासाहेबांवर व्याख्यान देणे (इंग्रजांविरुद्ध गर्जना, हिंदू
कोडबिल, ओबीसी प्रश्न)
प्रकरण पहिले
ब्राह्मण द्वेष वर्ज्य
आंबेडकरी कार्यकर्ता वा भारतीय बौद्ध म्हणून वावरणारा
प्रत्येक माणूस हा अमानवी ब्राह्मणी व्यवस्थेचा बळी आहे. ब्राह्मणांच्या अत्यंत
क्रुर नि समताद्वेषी व्यवस्थेची त्याला झड पोहचली आहे. त्यामूळे ब्राह्मणांच्या
बद्दल आमच्या लोकांच्या मनात प्रेम, आपूलकी वा आपलेपणा अजिबात नाही अन ते नैसर्गिक
व स्वाभावीक आहे. ज्या समाजाने आम्हाला हजारो वर्ष दास्यात ठेवले, आमचा तेजोभंग केला,
ज्यानी आमच्या पिढ्यान पिढ्या गुरा ढोरांच्याही पेक्षा खालच्या दर्जानी वागविल्या,
ज्यानी सदैव आम्हाला अमानवी वागणूक दिली त्या समाजा बद्दल मनात राग असणे स्वाभाविक
आहे.
पण...
पण बाबासाहेबानी आम्हाला या अंधारातून मुक्त केलं,
तोजोभंगातून उचलून तोजोमय वातावरणात उभं केलं. भगवान बुद्धाच्या महाकारुणीक
धम्माच्या कवेत दिलं. स्वातंत्र्य, समता व बंधूता याचं पालन करणा-या बौद्ध धम्माशी
आमची नाड जोडली. अन अशा समतेच्या धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या करुणामय
हेतूने बाबासाहेबानी भीम गर्जना केली की भारत बौद्धमय करणार.
आम्ही मागच्या पन्नास वर्षापासून आंबेडकर चळवळ मोठ्या
कष्टानी जिवंत ठेवली आहे. प्रत्येक जण आपापल्या परिणे धम्माचे कार्य करत आहे. पण
हे सर्व करताना आंबेडकर चळवळ ही एक दुर्गूण विकसीत करत गेली. ती म्हणजे ब्राह्मण
द्वेष. मुळात विधायक काम करताना द्वेषमूलक विचारसरणी नसावी ही पहिली गरज होय. कारण
मनात द्वेश असल्यास कार्यक्षमता कमी होते. मनात संताप असल्यास निर्णयक्षमता शीण
होत जाते. मन अस्वस्थ असल्यास विवेकाचं स्थान डगमगू लागतं. अन आम्हाला जे करायचं
आहे ते तर बौद्धमय भारत. हे काही लहान सहान स्वप्न नाही. यासाठी खपणारी माणसं वरील
एक जरी दोषाच्या कचाट्यात सापडली तर मग विधायक कामात अडचण अटळ आहे. याचं साधं
उदाहरण म्हणजे तुमचं घरच्याच सदस्याशी भांडण झालं तर तो अख्खा दिवस खराब जातो.
तुमच्या रोजच्या कामवर परिणाम झालेला दिसतो. हे का घडतं? कारण तुम्ही अस्वस्थ
झालात. मनात शल्य आहे, घरच्या लोकांवर तुम्ही नाराज आहात याचा परिणाम तुमच्या
कामावर, कार्यक्षमतेवर व निर्णयावर हमाखास पडतो. जर घरच्या सदस्यांवर नाराजीचा
परिणाम तुमच्या कामावर पडत असेल, मनस्थीती बिघडवत असेल तर मग ब्राह्मण द्वेषाचा
परिणाम तुमच्या आयूष्यात पडत नाही का? नक्कीच पडतो.
याचा अर्थ संपूर्ण कार्यक्षमतेनी काम करायचं असल्यास
सर्वप्रथम द्वेषमूक्त होणे अत्यंत गरजेचं आहे. एकदा द्वेषातून मूक्त झालात की
आपोआप कामात गती येईल. स्वस्थ मनानी केलंलं काम अधिक परिणाम साधतो. अन आमच्या पुढे
जे काम आहे ते बौद्धमय भारताचं. त्यासाठी स्वस्थ मनाची नितांत गरज आहे. बौद्धमय
भारताच्या कामात उतरण्या आधी जे काम करावं लागणार आहे ते म्हणजे मनाला द्वेषमूक्त
करणे. द्वेषमूक्त मनाची मानसं अत्यंत परिणाम कारक, प्रभावी नि निर्णायक कामं करतात
हे मानसशास्त्रीय सिंद्धात सर्वविदित आहे. वेगाने परिणाम साधन्यासाठी अशा सुदृढ
मनाची लोकं आमच्या संघाला हवी आहेत.
ब्राह्मणानी आमच्यावर अत्याचार केले, त्यानी तुच्छतेनी
वागविले. त्या बद्दल आमच्या मनात पराकोटीचा संताप आहे. पण ही वेळ संतापानी अस्वस्थ
होऊन सुडाचं समिकरण मांडण्याची नाही. तो संताप बाजूला सारुन बौद्ध व धम्माचं काम
करण्याची आहे. कारण बौद्धमय भारत या संकल्पनेची व्यापकता ईतकी मोठी आहे की त्यात
ब्राह्मणद्वेषाला थारा नाही. उलट भारत बौद्धमय करणे म्हणजे भारतातील समस्त बांधव
बौद्धमय करणे असा होय. म्हणजेच ईथे राहणा-या प्रत्येक माणसाला बौद्धमय करायचे आहे,
मग त्या माणसात ब्राह्मणही असेल. ब्राह्मण हा बहुतेक सर्वात शेवटी बौद्धमयी होईल
पण त्यालाही बौद्ध व्हावेच लागेल ही काळ्या दगडावरची रेष आहे. माणसं जोडण्याचा एक
साधा पण अत्यंत परिणामकारक मार्ग म्हणजे सदभावना. द्वेषानी माणसं दुरावतात, तर
बंधुत्वानी जोडल्या जातात. अन बाबासाहेबांच्या आज्ञेनी धम्माच्या मार्गावर
चालताना आम्ही सदैव बंधूत्व जोपासणार आहोत. मग याचा परिणाम काय होईल? माणसं
जुडतील की तूटतील? नक्कीच जुडतील, हा माझा आत्मविश्वास आहे. म्हणजेच ईतरांशी
बंधुत्वानी जसे वागतो तसे ब्राह्मणांशीही वागावे लागणार आहे. असे वागणे बौद्धमय भारताच्या प्रक्रियेत अपरिहार्यच आहे.
धम्माच्या आदेशानूसार आम्हाला ब्राह्मणांचा द्वेष करण्याचा अजिबात अधिकार नाही.
बंधूत्वानी वागण्याचा परिणाम असा निघेल की भारतातील सर्व लोकं बौद्ध धम्माकडे
वळतील. अन सगळ्यात शेवटी ब्राह्मणाना पर्यायच उरणार नाही. त्याना धम्माच्या
छत्रछायेत यावच लागेल. समतेच्या चळवळीत ब्राह्मण द्वेष करणे म्हणजे नविन विषमता
निर्माण करणे होय, अन असं केल्याने ही चळवळ समतेची चळवळच राहणार नाही.
ब्राह्मण काय करतात यांशी आज तरी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला त्यांच्या
बद्दल द्वेषमूक्त होऊन धम्माचे काम करायचे आहे. बास, त्यांच्या मनपरिवर्तनाची घडी
येईल तेंव्हा येईल. आमचा आजचा टार्गेट ब्राह्मण नसून ब्राह्मणेत्तर आहे.
-----------------------------------------
प्रकरण दुसरे
अराजकीय संघटना
आंबेडकर चळवळीच्या तीन आघाड्या, राजकीय आघाडी, धार्मिक
आघाडी व सामाजीक आघाडी. धार्मीक व सामाजीक आघाड्या मोठ्या कष्टानी चळवळ चालवित
आहे. अत्यंत परिणामकारन निकालही मिळत आहेत. पण राजकीय आघाडीनी मात्र स्वाभीमान
गहाण टाकून राजकीय नेत्यांच्या घरची गुलामी स्विकारली. याचा एकंदरीत परिणाम असा
झाला की आज आंबेडकरी चळवळीतील राजकीय आघाडीचे तिन तेरा वाजले. दुर्दैवाची गोष्ट ही
की मेनस्ट्रीम मिडीयानी नेमही याच आघाडीला आंबेडकर चळवळीचा कर्ता धर्ता म्हणून
प्रकाश झोतात ठेवल्यामूळे ईतर दोन आघाड्या झाकल्या गेल्या वा दुर्लक्षित राहिल्या.
अन राजकीय पराजय समिकरणावरुनच आंबेडकर चळवळीचे मुल्यांकन सुरु झाले.
मुल्यांकनासाठी ईतर दोन आघाड्याना कधी विचारात घेण्यातच आले नाही. त्यामूळे बौद्ध
बांधवांतील उदासिनता अधिकच वाढत गेली व स्वत:च्या चळवळी बद्धलचा आत्मविश्वास लयास
गेला.
आंबेडकर चळवळ म्हणजे एक फसलेली, हारलेली नि कणा व बाणा
नसलेली चळवळ असल्याचे ज्याला त्याला वाटू लागले. पण वास्तव मात्र अगदी निराळं आहे.
राजकीय आघाडी सोडुन ईतर दोन आघाड्यानी दैदिप्यमान वाटचाल केली. मागच्या पन्नास
वर्षात भारतातील प्रत्येक मुख्य शहरात अनेक विहारं उभी झालीत. सम्राट अशोकाच्या
काळात म्हणे ८४,००० विहारं व स्तूप बांधण्यात आली. मी म्हणजे आज ईथे येऊन बघा.
बाबासाहेबाच्या धम्म क्रांती नंतर प्रत्येक गावातून लहान सहान का होईना विहार उभी
राहीली. खेड्या पाड्यात, झोपड-पट्टीत व मोठ्याल्या शहरांमधून स्तूपांचं अस्तीत्व
परत एकदा दिसू लागला. हे सगळं परिवर्तन नक्कीच आशादायी आहे. हे कोणामुळे घडलं? सामाजीक व धार्मिक आघाड्यात
काम करणा-या धम्म उपासकांमूळे. म्हणून शाक्य संघात धार्मिक व सामाजीक वसा घेणारी,
ही संस्कृती चालविणारी माणसं हवीत. राजकारणाचं काय होईल ते होईल. ती आघाडी शाक्य
संघाशी निगडीत नसणारे. कारण राजकारणाची समीकरणं दिवसा गणिक बदलत असतात अन शाक्य
संघ स्थैर राखून काम करते. त्यामूळे राजकीय आघाडी पासून शाक्य संघ दूरच राहणार
आहे. शाक्य संघ हे संपुर्णत: अराजकीय संघटना असून धार्मिक व सामाजीक कार्य करणारी
बौद्ध मय भारताचे स्वप्न पुर्ण करणारी संघटना आहे.
प्रकरण तिसरे
बौद्धमय भारत
एक दिवा स्वप्न
बाबासाहेबानी बौद्धमय भारताचे जे स्वप्न पाहिले दुर्दैवाने अल्पावधीतच
त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामूळे ते
पुर्ण झाले नाही. पण आता ही जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. आता आमची सत्वपरिक्षा
आहे, ख-या कसोटीची वेळ आहे. आपल्याला भारत बौद्धमय करायचा आहे. मग ते कसे बौद्धमय
होणार याचा विचा करणे अत्यंत गरजेचे आहे.
नुसतं भारत बौद्धमय करु म्हटल्यानी होणार का? अजिबात नाही. त्यासाठी धोरनात्मक
कृतीची गरज आहे. मग धोरणं काय? तर एक अशी संघटना हवी जी बौद्धमय भारताच्या
कार्यासाठी अत्यंत समर्पक पणे कार्य करेल.
मी ती संघना कोणती? त्या संघटनेचे नाव आहे शाक्य संघं.
बरं आपल्याला संघटना सापडली, पण कार्य कसे करणार? आपण ते पाचव्या प्रकरणात
पाहू या. ईथे फक्त बौद्धमय भारत हे कसे दिवा स्वप्न आहे ते पाहणार आहोत.
तर बौद्धमय भारत हे एक दिवा स्वप्न आहे. ते अत्यंत कष्टाचे काम आहे. कारण भारत
हा हिंदु धर्मानी व्यापलेला व देवा धर्माच्या आहारी गेलेला देश असून ईथे
अंधश्रद्धांना उधाण आले आहे. दैववादानी प्रत्येक माणूस पछाळलेला आहे. जिकडे तिकडे देवाच्या
नावानी कर्तूत्वाचे व आत्मविश्वासाचे खच्चिकरण सुरु आहे. प्रत्येक कार्याचे यश
देवाशी थेट जुडत असल्यामुळे स्वत:वरील विश्वास क्षीण होत गेला आहे. त्याच बरोबर
संतपरंपरेनी या देशातील बहुजनाना देवाच्या नादी लावून मागच्या हजार वर्षात
बहुजनांचे मानसिक खच्चिकरण करुन ठेवले आहे. या सर्व अडचणीतून ईथल्या भारती समाजाला
बाहेर काढण्याचे काम म्हणजे एक दिव्य होय.
आत्मविश्वास गमावून बसलेल्या समाजाला त्याच्या कर्तूत्वाची व आत्मविश्वासाची
जाण करुन द्यावयाची आहे. त्याच्या कार्याचे श्रेय देवाला जात नसून त्याच्या
क्षमतेला जाते हे पटवून द्यावयाचे आहे. तुझ्या यशात देवाच्या कृपेचा काळीमात्र
संबंध नसून तुझ्या कार्याक्षमतेमूळे ते मिळाले हे पटवून दयायचे आहे. त्याच बरोबर
दैववादा पासून या समाजाला हळु हळू तोडायचे आहे व वस्तूनिष्ठ बनवायचे आहे. ही सर्व
कामं वाटतात तेवढी सोपी नाही म्हणून बौद्धमय भारत एक दिवास्वप्न आहे.
आज भारतातील बहुजन समाज ब-यापैकी विद्याविभूषीत झाला आहे. त्याच बरोबर अत्यंत
झपाट्याने आर्थिक प्रगतिही होत आहे. पण याच वेगाने जी सामाजीक प्रगती व्हायला
पाहिजे होती ती होत नाही. याच बरोबर जी वस्तूनिष्ठता यायला पाहिजे ती येत नाही.
विज्ञान वादी दृष्टिकोन विकसीत व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही. याचा
एकंदरीत परिणाम असा मिळत आहे की ईथली समाज आर्थीक प्रगती करु लागला खरा पण
त्याच्या दैनंदीन जिवनात असलेला धार्मिक प्रभाव विज्ञानवादी बनण्यापासून त्याला
रोखतो आहे. त्याला आधी विज्ञानवादी नि वस्तूनिष्ठ बनवायचे आहे. हे फक्त बौद्ध
धम्मांतर्गतच बनविल्या जाऊ शकते. या सर्व गोष्टी दिवा स्वप्नच आहेत. तरी ते असाध्य
मात्र अजिबात नाहीत. हे सर्व घडवून आणण्याचे स्वप्न शाक्य संघाने संकल्पिले आहे.
प्रकरण चवथे
संघ प्रवेशाच्या अटी
भारत
बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहणा-या अनेक संघटना ईथे आहेत पण कुणाच यश येताना दिसत
नाही. त्याची कारण अनेक आहेत. त्या सर्व कारणांचा अभ्यास केल्यावर शाक्य संघानी
संघप्रवेशाच्या अटी व नियम ठरवुन दिले आहे.
अटी का
असाव्यात हा एक मुख्य प्रश्न आहे.
अटी
नसल्या की कार्यप्रणालीत बेशस्त वाढते. जिथे कामाला शिस्त नाही तिथे यशाचा ग्राफ
खालच्या दिशेनी जाऊ लागतो. याची परिणिती ठरवलेल्या ध्येय धोरणा पासून संघटना दूर
जाण्यात होते. आज पर्यंतच्या अनेक संघटनाना अपयश येण्याचे हे मुख्य कारण आहे.
एखादे कार्य तळीस न्यायचे असल्यास ते कार्य कसे शिस्तबद्ध पद्धतीने पुर्णत्वास
नेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आपले
स्वप्न काय? तर बौद्धमय भारत.
मग
आपल्याला त्या कार्यासाठी संघात एक शिस्त ठेवावी लागणार की नाही? लागणारच. मग ती
शिस्त काय? तर संघात येणा-यां प्रत्येक
शाक्यानी खालील अटी व नियमाचे पालन केलेच पाहीजे तेंव्हाच कुठे या देशाला बौद्धमय
करता येईल. आम्हाला खंडे शाक्य हवेत. उगीच संख्याबळ दाखविण्यात आम्हाला अजिबात
स्वारस्य नाही. शाक्य कमी असले तरी चालेल पण ते पुर्णपणे वाहून घेऊन काम करणारे
असावे.
अटी
येणेप्रमाणे.
१)
शाक्य संघात
प्रवेश घेतल्या नंतर त्या व्यक्तीनी आपल्या नावासमोर शाक्य अशी उपमा लावावी.
२)
शाक्य संघात
प्रवेश घेण्यासाठी संघ प्रवेशाची दिक्षा घेणे अनिवार्य आहे.
३)
शाक्य संघात
प्रवेश घेतल्या नंतर धम्म दिक्षाही घेणे अनिवार्य आहे.
४)
कुठल्याही
शाक्याला मध्यपान करण्याची परवानगी नाही.
५)
बिडी व
सिगारेट हे प्रत्येक शाक्याला वर्ज्य आहे.
६)
मांस व मटन
खाण्यास शाक्याला परवानगी नाही. पण एखाद्यानी अन्नदानात दिले तर ते खाता येईल.
मात्र स्वत: मांसाहारी भोजनाची ईच्छा बाळून ते सेवन करण्यास परवानगी नाही.
७)
देव देवतांची
पुजा करण्यास सक्त मनाई आहे.
८)
ईतर देव
देवतांची टिंग टवाळकी करण्यासही मनाई आहे.
९)
व्यभीचार
करण्यास मनाई आहे.
१०)
चोरी करण्यास
मनाई आहे.
११)
खोटे बोलण्यास
मनाई आहे.
१२)
द्वेषमूलक
भाषण वा संवद करण्यासही मनाई आहे.
१३)
बौद्ध धम्माला
अनूसरुन जिवन जगणे आवाश्यक आहे.
१४)
बाबासाहेबांच्या
२२ प्रतिज्ञा सर्वाना बंधनकारक आहेत.
अशा प्रकारे शाक्य संघात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक शाक्यास
वरील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
त्याच बरोबर दर रवीवारी प्रत्येक शाक्यानी वंदना व पूजा करणेही अनिवार्य आहे.
धम्माचे कार्य व त्याचा प्रसार अशी अत्यंत महत्वाची
जबाबदारी प्रत्येक शाक्यावर असल्यामूळे त्यानी अत्यंत जबाबदारीने, बंधुत्वाने व
सदभावनेने वागणे गरजेचे आहे. भारत बौद्धमय करण्याचे द्विव्य स्वप्न पाहणा-या शाक्य
संघाच्या प्रत्येक शाक्याला बौद्ध धम्माचा उत्कर्ष अभीप्रेत असावा.
प्रकरण पाचवे
कार्यप्रणाली
(धम्मदिक्षा व संघदिक्षा)
हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की शाक्य संघ काम कसं करणार? त्याची
कार्यप्रणाली कशी असणार? शाक्य संघात जो प्रवेश घेतो त्याला सर्वप्रथम आपल्या
नावाच्या पुढे शाक्य लावणे अनिवार्य आहे. ही शाक्य संघातल्या सदस्याची ओळख पटवून
देणारी मूलभूत व प्राथमीक बाब आहे. अशा सर्व शाक्यांवर बौद्धमय भारताची जबाबदारी
असल्या कारणास्तव त्यांच्या कार्यप्रणालीची रुपरेषाही असणे गरजेचे आहे. तर
प्रत्येक शाक्याला खालील कार्यप्रणाली प्रमाणेच बौद्धमय भारताच्या दिव्य
स्वप्नासाठी काम करावे लागणार आहे.
शाक्य:
संघात जो प्रवेश घेतो तो शाक्य. संघात प्रवेश घेतल्या पासून तो स्वत:स शाक्य
ही उपमा लावण्यास पात्र ठरतो. त्याचे काम तळागळातील सर्व लोकांपर्यंत पोहचने.
धम्माचा प्रचार व प्रसार करणे. धम्म मित्र व धम्मचारी यांची प्रवचने आपल्या घरी, नातेवाईकाकडे व आपल्या
भागात ठेवणे. त्याच बरोबर ईतर सर्व धम्माच्या
प्राथमिक कामात आपले सहकार्य देणे. त्यामूळे धम्म मित्र व धम्मचारी याना धम्म
प्रसार कार्यत मदत होईल अशी सर्व जबाबदारी स्थानीक पातळीवर शाक्यानी करावयाची आहे.
धम्ममित्र:
धम्म मित्र बनण्यासाठी किमान एक वर्ष तरी
शाक्य म्हणून काम केल्याचा अनूभव असावा. थेट धम्ममित्र बनता येणार नाही.
सुरुवातील एक वर्ष शाक्य म्हणून काम केल्या नंतरच धम्म मित्र म्हणून काम करता
येणार. धम्म मित्राची जबाबदारी अशी असेल की त्यानी सर्व शाक्यांची आपला संवाद
ठेवावा. त्याच बरोबर स्थानीक पातळीवर मोठ्या प्रमाणात धम्म कार्य घडवून आणावे.
सर्व शाक्याना धम्माचे ज्ञान देण्याचे कार्य करावे. जिथे अडचण येईल तिथे
धम्मचारींची मदत घ्यावी. अशा प्रकारे शाक्य व धम्म मित्र यांच्यातील संवाद असावा
नि तो धम्मचारी याच्याशी जुडणारा असावा.
धम्मचारी:
धम्मचारी हे पद तीन वर्ष धम्म मित्र म्हणून संघात काम केल्या नंतरच देण्यात
येईल. ते ही नुसते तीन वर्षाच्या सेवेनी मिळणार नसून धम्माचे आचरण करण्याची क्षमता
आल्यावर मिळणार. धम्मचारी हा शाक्य संघातील अत्यंत आदरणिय व मुख्य उपासक असणार.
धम्म प्राचाराची मुख्य जबाबदारी त्या त्या भागातील धम्मचा-यांची असणार. धम्मचारी
हा धम्माचे आचरण करणारा असावा त्याच बरोबर बुद्ध आणि त्याचा धम्म या
ग्रंथाचा संपुर्ण अभ्यास असणे अनिवार्य आहे. त्याच्या जोडीला त्रिपिटिक, मिलिंद
पन्न व जातक कथांचाही जास्तीत जास्त अभ्यास असावा. ही सर्व ज्ञानसंपदा धम्माचा-यास अनिवार्य आहे.
त्या नंतरच धम्मचारी धम्म कार्यास गतीमान करु शकेल.
बाबासाहेब आंबेडकरानी या मातीत बौद्ध धम्माची पुन: स्थापना केली. अशा या
बोधत्व बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रही अभ्यासणे अनिवार्य असेल.
वरील तीन प्रकारे शाक्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्या त्या पातळीवर हे
शाक्य धम्म प्रचाराचे कार्य करतील.
प्रकरण सहावे
व्याख्यान मालिका
(शाळा महाविद्यालयातू व्याख्याने, हिंदू कोडबील व ओबीसी)
बाबासाहेब समजून घेऊ या- व्याख्यान मोहिम
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या विद्यार्थ्याला बाबासाहेब माहित नाही. शाक्य
संघाचे सदस्य प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात व सामाजीक संस्थांमध्ये व सरकारी
कार्यालयात जाऊन अकथीत बाबासाहेबांवर व्याख्यान देण्याचं काम शाक्य संघ करतो आहे.
संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं विविध व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न
केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेत सादर केले होते. ते नामंजूर
करण्यात आले होते. हिंदू कोड बिलाच्या रूपाने महिलांना स्वतंत्र अधिकार देण्याचा हेतू
डॉ. आंबेडकर यांचा होता. हिंदू कोड बिल म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
होता."बिल नामंजूर झाल्यानंतर बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
महिलांचा अवमान होत असताना त्यांना स्वतंत्र अस्तित्व देण्याचा मानस बाबासाहेबांनी
या कायद्यातून मांडला होता. परंतु, त्यावेळी राज्यकर्त्यांनीच त्याला मूठमाती दिली. हिंदू कोड बिलामध्ये घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाहापासून
तर शैक्षणिक आणि राजकीय अधिकार होता. बाबासाहेब स्त्रीमुक्तीचे शिल्पकार होते, परंतु त्यांना श्रेय देण्याचा हेतू राजकीय पक्षांचा नव्हता.
यामुळेच ते बिल नामंजूर करण्याचे षड्यंत्र क्रॉंगेसच्या सरकारने केले होते.मात्र, आज याच बिलातील तरतुदी विविध कायद्याच्या रूपाने अमलात येत आहेत,सर्व समाजातील महिलांना सत्ता व संपत्तीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने
वाटा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला त्यावेळी विरोध
करण्यात आला. आता सत्ता आपल्याच घरात ठेवून घराणेशाही जपण्यासाठी व ओबीसींची राजकीय
ताकद वाढू नये यासाठी महिला आरक्षणाचा विचार पुढे आल्याचे दिसून येत आहे ,डॉ.आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कायदा विधेयक हे दलित महिलांसाठी
नव्हे तर ब्राम्हण,
मराठा, ओबीसी आदी सर्वच
समाजातील महिलांना सत्ता व संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा म्हणून मांडले होते. समाजातील
सर्वच स्त्रियांसाठी डॉ. आंबेडकर लढत होते. स्त्री पुढे गेली तरच देश पुढे जाईल. देशाची
प्रगती स्त्रीच्या प्रगतीवर मोजायची असे विचार डॉ. आंबेडकरांचे होते. मात्र डॉ. आंबेडकरांच्या
विचारांना विरोध करुन हिंदू कोड बिल संमत न करता त्याला विरोध केला गेला आणि आता महिलांचा
पुळका दाखविला जात आहे. डॉ.बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध हिंदू संस्कृतीच्या
तथाकथित पहारेकार्यानी केला ज्या धर्मात स्त्रीला शूद्र म्हणत होते तिला पुरुषांच्या
बरोबरीने बाबासाहेबांनी आणले होते आणी हेच मुळी या हिंदू संस्कृतीच्या रक्षकांना नको
होते ,
या हिंदू कोड बिलामुळे हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होईल किंवा हिंदू
धर्मात पेच प्रसंग निर्माण होतील म्हणून केवळ हिंदू कोड बिलाला विरोध करण्यात आला होता
,
पण आज हेच बिल तुकड्या तुकड्यात पास करून कॉंग्रेस बाबासाहेबांच्या
कार्याचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत , माझे बाबासाहेबांच्या विचार वाहकांना आवाहन करतो कि बाबासाहेबांवर झालेल अन्याय
हा कधीही विसरू नये आणी त्यांच्या लपलेल्या सर्व विधायक कार्यांची ओळख जगला करून द्या
.
आपली घटना मंजूर झाल्यावर बाबासाहेबांनी केलेल्या भाषणात आर्थिक व सामाजिक न्यायाचे
महत्त्व प्रतिपादन केले. ते महत्त्वाचे आहे. पण त्याच भाषणात त्यांनी आणखी असे सांगितले
की,
‘‘आपल्याला वरवरची नव्हे तर खरी लोकशाही टिकवायची असेल, तर माझ्या मते आपण आपली आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
घटनात्मक साधनांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ आपण सनदशीर कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यांचा त्याग केला पाहिजे. सामाजिक व आर्थिक
उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी घटनात्मक साधने उपलब्ध असताना घटनाबाह्य उपायांचा
अवलंब करणे समर्थनीय नाही. हे उपाय म्हणजे अराजकाचे व्याकरण आहे. आपण जितक्या लवकर
त्यांचा त्याग करू तितके बरे’’.